लिंबाचे लोणचे

limbache-lonche-recipe-marathi

limbache-lonche-recipe-marathi

लिंबाचे लोणचे

साहित्य :

लिंबं मध्यम आकाराची पंचवीस प्रत्येकी आठ तुकडे करून.

तिखट अर्धी वाटी

मीठ एक वाटी

मेथीपूड एक चमचा

साखर एक किलो

हळद दोन चमचे

हिंगपूड एक चमचा

कृती:

स्टेनलेस स्टीलच्या मोठ्या पातेल्यात लिंबांचे तुकडे घेऊन त्यात मीठ, हळद मिसळावं व झाकून ठेवावं.

दिवसातून तीन-चारदा मिसळून पुन्हा झाकून ठेवावं.

असं पाच-सहा दिवस करावं.

मोठ्या पातेल्यात साखर घेऊन त्यात दीड ग्लास पाणी घालावं.

जरा घट्ट होऊ लागेपर्यंत उकळू द्यावं.

त्यात लिंबाच्या फोडी, मेथीपूड, तिखट व हिंग घालून थोडा वेळ ढवळत राहावं.

मंद आचेवर पाच-दहा मिनिटं शिजवावं. जरा घट्टपणा आला, की उतरवावं.

गार झाल्यावर घट्ट होतं. म्हणन फार वेळ शिजवू नये.

गार झाल्यावर कोरड्या बरणीत भरावं.

पावसाळ्यात लिंबाचं लोणचं करू नये, पावसाळा संपल्यावर करावं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.