मूग-पालक खिचडी (सिंधी प्रकार)

mug-palak-khichdi

mug-palak-khichdi

मूग-पालक खिचडी (सिंधी प्रकार)

साहित्य :

दीड वाटी तांदूळ,

एक वाटी मोडाचे मूग

एक-दीड वाटी बारीक चिरलेला पालक

एक चमचा आलं-लसूण वाटण

दोन चमचा धने- जिरं पूड

अर्धा चमचा गरम मसाला

एक चमचा तिखट

अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो

हळद

मीठ

कोथिंबीर

चार-पाच वाट्या उकळतं पाणी

तीन मोठे चमचे तेल

कृती :

तांदूळ आणि मोडाचे मूग वेगवेगळे धुऊन निथळावे.

जाड बुडाच्या भांड्यात तेल तापवून मोहरी, आलं-लसूण वाटण, मूग, टोमॅटो, हळद, तिखट मसाला आणि तांदूळ परतावे.

त्यावर धने-जिरं पूड, पालक आणि चवीनुसार मीठ घालून लागेल तसं उकळतं पाणी घालून खिचडी शिजू द्यावी.

मऊ आणि मोकळी शिजली की कोथिंबीर घालून उतरवावी.

सोबत लोणचं, पापड आणि गोड दही किंवा ताक द्यावं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.