पनीर बिर्याणी

paneer-biryani-recipe-marathi

paneer-biryani-recipe-marathi

पनीर बिर्याणी

साहित्य :

तीन वाट्या बासमती तांदूळ

पाव किलो पनीर

अर्धी वाटी तूप

सहा लवंगा

चार हिरवे वेलदोडे

चार दालचिनीच्या काड्या

दोन-तीन तमालपत्र

वाटणासाठी

दहा-बारा लसूण पाकळ्या

एक इंच आलं

एक मोठा टोमॅटो

एक मोठा कांदा

पाव वाटी कोथिंबीर

दहा-बारा पुदिन्याची पानं

एक चमचा गरम मसाला

एक चमचा तिखट

एक चमचा हळद

मीठ

सजावटीसाठी :

थोडा तळलेला कांदा, तळलेले काजू-बेदाणे.

कृती :

तांदूळ स्वच्छ धुऊन निथळावा. पाच-सहा वाट्या पाणी उकळावं.

मसाला वाटून घ्या आणि भांड्यात दोन मोठा चमचा तूप तापवून अख्खा मसाला फोडणीला घाला

त्यावर तांदूळ परतून मोकळा भात शिजवून घेऊन तो गार करावा.

कढईत उरलेले तूप तापवून यामध्ये वाटलेला मसाला खमंग परतावा.

पनीरचे एक इंची चौकोनी तुकडे करून त्यात मिसळावे.

जरूरीनुसार गरम पाणी घालून दाटसर ग्रेव्ही करावी.

जाड बुडाच्या भांड्याला तळाशी तूप लावून पनीर मसाला, भात, तळलेला कांदा, काजू-बेदाण्याचे थर द्यावे

वर घट्ट झाकण ठेवून भांडं तव्यावर ठेवावं आणि मंद आचेवर वाफ येऊ द्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.