सत्वान्न भात

satvann-recipe-marathi

satvann-recipe-marathi

सत्वान्न भात

साहित्य :

दोन वाट्या तांदूळ

मोड काढलेले हिरवे मूग

मटकी चवळी मसूर आणि हरभरे प्रत्येकी पाव वाटी

तीन बारीक चिरलेले टोमॅटो

पाव वाटी तेल

फोडणीसाठी

मोहरी

हिंग

हळद

कढीपत्ता

चवीनुसार थोडं खोबरं

कोथिंबीर

साजूक तूप

मसाला :

दीड चमचा आलं-लसूण वाटण

एक मोठा चमचा धने दाण्याची पूड

दोन चमचे गरम मसाला

एक चमचा तिखट

कृती :

तांदूळ स्वच्छ धुऊन चाळणीत निथळून घ्यावेत .

कडधान्य धुऊन वेगळी उपसावी. सहा-सात वाट्या पाणी उकळून घ्यावं.

एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून मोहरी, हिंग, हळद फोडणीला घालून दिलेला मसाला परतावा.

खमंग वास सुटल्यावर टोमॅटोच्या फोडी आणि कडधान्यं घालून परतावं.

उकळतं पाणी आणि मीठ घालून अर्धंकच्चं शिजवावं.

नंतर त्यात तांदूळ वैरावे आणि जरुरीप्रमाणे पाणी घालून सत्त्वान्न मऊसर शिजवावं.

वाढताना वर खोबरं-कोथिंबीर आणि साजूक तूप घालावं. सोबत लोणचं,-भाजलेला पापड आणि दही किंवा ताक घ्यावं.

अचानक बेत ठरल्यास हरभरा, तूर, मूग आणि मसुराची डाळ घालून सत्त्वान्न करता येतं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.