तहरी राईस

tahari-rice-recipe-marathi

tahari-rice-recipe-marathi

तहरी राईस

साहित्य :

दोन वाट्या बासमती तांदूळ

अर्धी वाटी चिरलेला टोमॅटो

एक वाटी लांब पातळ चिरलेला कांदा

एक चमचा आलं

अर्धी वाटी मटारदाणे

लसूण वाटण

अर्धी वाटी तेल

बारीक चिरलेलं गाजर- फ्लॉवर- फरसबी- दोन वाट्या

अर्धा चमचा हळद

एक चमचा तिखट

अर्धा चमचा गरम मसाला

मीठ

कृती :

तांदूळ धुऊन निथळावे. साडेचार-पाच वाट्या पाणी उकळावं.

भांड्यात तेल तापवून कांदा लालसर तळून बाजूला ठेवावा.

उरलेल्या तेलात सगळ्या भाज्या, आलं-लसूण वाटण, हळद, मिरची, गरम मसाला आणि टोमॅटो परतून त्यावर तांदूळ घालावे.

चवीनुसार मीठ आणि जरुरीप्रमाणे गरम पाणी घालून ताहिरी शिजवावी.

तांदूळ बोटचेपा शिजला की तळलेला कांदा घालून अलगद ढवळावं

आणि भात पूर्ण शिजू द्यावा.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.