तोंडल्यांचा भात

tondli-bhat-recipe-marathi

tondli-bhat-recipe-marathi

तोंडल्यांचा भात

साहित्य :

दोन वाट्या जुना आंबेमोहोर तांदूळ

पाव किलो कोवळी तोंडली

एक मोठा चमचा गोडा मसाला

अर्धी वाटी ओलं खोबरं

मीठ

तिखट

चिरलेली कोथिंबीर

साखर

थोडा लिंबाचा रस

आणि तेल.

बाकी सगळं साहित्य आणि मसाला मसालेभाताप्रमाणे घ्यावा.

कृती:

तोंडली धुऊन त्यांना एका बाजूनं उभी-आडवी चीर द्यावी.

दिलेला मसाला एकत्र करून जाडसर वाटावा आणि त्यात थोडा थोडा भरावा.

तांदूळ धुऊन निथळावा. पाणी उकळत ठेवावं.

मसालेभातासाठीचा मसाला करून घ्यावा.

जाड बुडाच्या भांड्यात तेल तापवून भरलेली तोंडली परतावी.

झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. नंतर ती काढून घेऊन पुन्हा थोडं तेल घालावं.

मसालेभात दिलेल्याप्रमाणे भात शिजत टाकावा.

अर्धवट शिजला की तोंडली मिसळावी आणि दोन्ही एकत्र शिजवावं. वाढताना वर खोबरं, कोथिंबीर घालून वाढावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.