उडदाचे पापड

udid-papad-recipe-marathi

udid-papad-recipe-marathi

उडदाचे पापड

साहित्य :

एक किलो उडदाची डाळ,

३० ग्रॅम पापडखार (भाजलेला)

५० ग्रॅम पांढरे मिरे

२५ ग्रॅम हिंग

एक सपाट वाटी मीठ

पाव किलो ओल्या मिरच्या

पाव वाटी तेल

पापड लाटण्याकरता अंदाजे पाव किलो उडदाच्या डाळीचे पीठ निराळे द्यावे.

कृती :

मिरच्यांवर उकळते पाणी घालून, त्या उन्हात वाळत घालाव्या, म्हणजे त्यांना पांढरा रंग येईल.

उडदाची डाळ, मिरे, पापडखार, हिंग व वरील मिरच्या एकत्र करून दळावे.

घरी जात्यावर दळून घेतल्यास जास्त चांगले.

गिरणीतून दळून आणल्यास उडदाची डाळ दळून आणावी व बाकीचे साहित्य घरी कुटून बारीक पूड करावी.

पाण्यात मीठ घालून उकळावे व गाळून घ्यावे. त्या पाण्यात वरील तयार केलेले पीठ व तेल घालून भिजवावे व चांगले कुटावे.

नंतर लहान गोळ्या (लाट्या) करून, उडदाचीच पिठी लावून पापड लाटावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.