बिरड्यांचा भात (वालांचा भात)

walacha-bhat-recipe-marathi

walacha-bhat-recipe-marathi

बिरड्यांचा भात (वालांचा भात)

साहित्य :

दोन वाट्या जुना आंबेमोहोर किंवा बासमती तांदूळ

दोन वाट्या सोललेले कडवे किंवा गोड वाल

चार-पाच लसूण पाकळ्या

तीन हिरव्या मिरच्या

एक चमचा जिरं

पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं

दोन वाट्या ओल्या नारळाचं दूध

एक चमचा गोडा मसाला

एक चमचा कच्चा मसाला

मीठ

साखर

फोडणीचं साहित्य

कढीपत्ता, तेल, खोबरं, कोथिंबीर.

कृती

तांदूळ आणि बिरड्या वेगवेगळे धुऊन निथळावे. जिरं-खोबरं-लसूण मिरची एकत्र वाटावी.

तीन वाट्या पाणी उकळत ठेवावं.

जाड बुडाच्या भांड्यात पाव वाटी तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून प्रथम बिरड्या परताव्या.

त्यावर खोबऱ्याचं वाटण, दोन्ही प्रकारचे मसाले आणि तांदूळ घालून दोन वाट्या उकळतं पाणी आणि दोन वाट्या दूध तसंच चवीनुसार मीठ-साखर घालून भात शिजू द्यावा.

जरुरीप्रमाणे उरलेलं पाणी घालून भात मऊ पण मोकळा शिजवावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.